विश्वकर्मीय लोहार सेवा संघ, मुंबई (रजि.एफ-६०५०)


श्री.मदन शांताराम कोळंबेकर साहेब

  अशा व्यक्तीसाठी असते , कर्म हिच पूजा...
आपण ज्या समाजात जन्माला आलो, त्याचे आपण काहीतरी देणं लागतो याची जाणीव जे ठेवतात...
आपल्या समाजातील उद्योजक श्री.मदन शांताराम कोळंबेकर साहेब यांनी आपल्या समाजातील तरुण युवक-युवतींनी त्यांच्याप्रमाणेच उद्योजक व्हावेत हे त्यांचे स्वप्न आहे.
हा उद्देश साध्य करण्यासाठी काही तज्ञ मंडळींना निमंत्रित करून जुईनगर येथे "व्यक्तिमत्व विकास शिबीर" आयोजित केले होते यातून सामाजिक बांधिलकी व उद्योजक होण्यासाठी ज्ञाती बांधवाना विचार दिले.
संगणक युगामध्ये ज्ञातीतील बंधु -भगिनी व मुला-मुलींना संगणकाचे ज्ञान मिळावे म्हणून चुनाभट्टी येथे संगणकाचे क्लासेस चालवून पूर्तता केली.
"सामूहिक विवाह सोहळा" अशा प्रकारचे उपक्रम स्वतःकडील अर्थसहाय्य देऊन यशस्वी रित्या पार पाडले. तुम्ही केलेल्या सहकार्य बद्दल गौरव म्हणून संस्थेने २०११ साली "लोहार विभूषण पुरस्कार" देऊन सन्मानित केले आहे. अशाप्रकारे तुम्ही दिलेल्या बहुमोल योगदान व सहकार्यासाठी "विश्वकर्मीय लोहार सेवा संघ, मुंबई आणि सर्व ज्ञातिबंधाव आपले शतशः ऋणी आहेत.