विश्वकर्मीय लोहार सेवा संघ, मुंबई (रजि.एफ-६०५०)

Vishwakarma God

   आपला समाज शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व व्यावसायिक इत्यादी विविध क्षेत्रात मागासलेला आहे या समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कै. श्री. देऊ दाजी चरकरी यांच्या अध्यक्षतेखाली १९४२ साली " विश्वकर्मा अखिल मनू पांचाळ उत्कर्ष ब्रम्ह सेवा समाज या नावाने हि प्रथम संघटना कार्यास सुरुवात करण्यात आली परंतु या प्रयत्नात ज्ञाती बांधवांचे योग्य ते सहकार्य मिळाले नसल्यामुळे तो प्रयत्न असफल ठरला व हि संघटना १९५६ पर्यंत चालली

   नंतर आपल्या समाजातील काही उत्साही तरुणांनी १९६१ साली "मनू पांचाळ युवक संघाची स्थापना केली नंतर काही काळ काम बंद पडल्यानंतर १९६५ साली नव्या उमेदीने सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली, समाज बांधवात जागृति व संघटनात्मक कार्य वाढीसाठी मुंबईत व उपनगरात राहणाऱ्या प्रत्येक ज्ञाती बांधवांच्या व्यक्तिशः गाठीभेटी घेतल्या. समाजाच्या विविध पातळीवरील दैन्यवस्था व आपली कर्तव्य यांची जाणीव करून देण्याचे प्रयत्न करण्यात आले. वेळोवेळी सर्वसाधारण सभा, प्रचार दौरे, विभागीय सभा घेऊन संघटनात्मक ऐक्याचे महत्व व त्यापासून होणारे फायदे विशद करण्यात आले. त्यासाठी प्रत्येक ज्ञाती घटक संस्थेचे सभासद व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात आले.

पण त्यात श्रमाइतके सहकार्य मिळू शकले नाही म्हणून स्नेहसंमेलनासारखे कार्यक्रम आयोजित केल्यास सर्व आबालवृद्ध स्त्री-पुरुष सदर सांस्कृतिक कार्यनिमित्त एकत्र आल्यास त्यांच्यासमोर सामाजिक कार्याचे महत्व ,लोकजागृति, शैक्षणिक, सामाजिक इत्यादींबाबतीत वैचारिक जागृति , समाजाबाबत ओढ निर्माण करणे,अन्य विचार आणि आदर्श आदी मांडता येतील तसेच वर्षातून एकदा का होईना सर्व ज्ञाती बंधू-भगिनी एकत्र येतील त्यांच्यात ओळखी होतील,वाढतील.

याद्वारे भावनात्मक, संघटनात्मक ऐक्य घडविता येईल इत्यादी गोष्टी नजरेसमोर ठेवून एक प्रभावी साधन म्हणून आपला आद्य समाज पुरुष, कलेचा निर्माता श्री. विश्वकर्मा यांचा जयंतोत्सव साजरा करण्याचे ठरविले आणि या निमित्ताने १९६९ साली *'विश्वकर्मीय' लोहार सेवा संघ ,मुबई* ची स्थापना झाली व त्याचा पहिला विश्वकर्मा जयंती उत्सव समारंभ मे १९६९ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला व तो दरवर्षी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो. हा समारंभ पार पडे पर्यंत कार्यकर्त्याना आपले कामकाज संभाळून व कोणताही आर्थिक मोल न घेता दिवसरात्र कार्य करीत आहे. त्यांना कधी कधी ज्ञाती बांधवांचे विचित्र वागण्याचे मानसिक ताप सहन करावा लागतो. अशी कित्येक वर्ष कार्यकर्ता समाज्याच्या प्रगति साठी कार्यशील आहे.

संस्थेने अंगिकारलेली ध्येय व उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते सतत प्रयत्नशील आहेत. आपल्या समाजाच्या प्रगति साठी काही महिला कार्यकर्त्याही एक पाऊल पुढे टाकून मदत करीत आहे.